स्माईल प्लीज !

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

स्माईल प्लीज !

तीसेक वर्षापूर्वी,जेव्हा so called इडियट बाॅक्स म्हणजे टी. व्ही. ने घरात प्रवेश केला नव्हता, तेव्हा सिनेमासाठी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडायचे. त्यावेळी मोठ्या पडद्यावरील हिरोंना जसा प्रचंड ‘भाव’ होता, तसाच भाव हास्य अभिनेत्यांना होता. मराठी सिनेमात तर मध्यंतरी विनोदी चित्रपटांची लाटच आली होती. मराठीतल्या अनेक विनोदवीरांनी मराठी प्रेक्षकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले. आजही दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांच्या तुलनेत विनोदी मालिका किंवा काॅमेडी शोज चा टी.आर.पी. जास्त असतो. याचाच अर्थ आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात लोकांना विनोद हवाय. लोकांना विरुंगळा हवाय.

पूर्वीच्या काळी, मानसिक ताण-तणाव वाढले की डॉक्टर औषध गोळ्यांच्या प्रिस्क्रीप्शन बरोबर टूनटून, मेहमूद , जॉनी वाॅकर यांचे सिनेमे पहाण्याचा सल्ला देत, कारण ‘हास्य’ हा यावरील उत्तम उपचार आहे यावर त्यांचा विश्वास होता.

हास्यामुळे काय होत नाही? हास्यामुळे शरिराला व्यायाम तर होतोच पण अनेक महत्वाच्या उपयुक्त अशा शारीरिक क्रिया घडतात.

आरोग्याच्या दृष्टीने हसण्याचे फायदे रडण्यापेक्षा अधिक असतात. हसण्यामुळे शरिरातील रक्तवाहिन्या उत्तेजित होतात. रक्ताचा प्रवाह वाढतो, त्यामुळे सर्वत्र रक्तपुरवठा चांगला होतो. हसण्यामुळे उच्च रक्तदाब आणि डोकेदुखी कमी होते. श्वसनसंस्था सुधारते,श्वास वेगाने चालतो, त्यामुळे जादा प्राणवायू आपण हवेतून घेतो. शारिरीक दृष्टीने हास्याचा जन्म फुफुसात होतो. हसण्यामुळे छातीचे चांगले प्रसरण होते.

बऱ्याचदा आपण म्हणतो की, ‘पोट धरधरून हसलो’ पोट न धरता जरी हसलो तरी , हसताना पोट आपोआप हलते आणि पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो. सततच्या हास्यामुळे पोट घुसळले जाते आणि अन्नपचन चांगले होते. जठर आणि आतडयांचे कार्य चांगले राहते.

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण साध्या स्मितहास्यासाठी देखील किमान तेरा स्नायू कार्यरत व्हाव्या लागतात. हसण्यामुळे त्वचेमधील घाम बाहेर टाकणाऱ्या पेशी उत्तेजित होतात, ताज्या होतात आणि शरीरात नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात. हसताना शरीराची एकत्रित हालचाल होत असते. त्यामुळे शरीराला एक लय प्राप्त होते.

‘हसा आणि लठ्ठ व्हा’ असे वाचन आहे, त्यामागे सुद्धा एक तत्वज्ञान आहे. ‘हसणे’ म्हणजे एक प्रकारचे टॉनिकच आहे. टॉनिक घेतल्याने जसे वजन वाढते. त्याप्रमाणे हसण्यामुळे ‘स्वास्थ्य’ लाभते, असा अर्थ त्याला अभिप्रेत आहेत. खरे तर निसर्गाने दुःखावर निर्माण केलेले ‘हास्य’ हे एक स्वस्त आणि फायदेशीर औषधच आहे.

‘लॅन्सेट’ नावाच्या वैद्यकीय नियतकालिकानुसार ‘प्रसन्न मनोवृत्तीची गरज आजारी आणि अशक्त व्यक्तींना जास्त असते. आजारी व्यक्ती प्रसन्न मनोवृत्तीच्या जोरावर तगू शकतात. कारण ‘ही मनोवृत्ती’ जगण्याची इच्छा निर्माण करते ,जीवनाला नवे परिणाम देते. ‘जर तुम्ही प्रसन्न आणि हसतमुख असाल तर सर्वांचाच फायदा होतो. ‘कसे जगावे’ हे जर तुम्हाला शिकायचे असेल , तर आधी हसतमुख राहायला शिका. दिवसाची सुरूवात स्मित हास्याने करा.तुम्ही तर हसतमुख राहाच पण घरातल्या लहान मुलांना आत्तापासून हसतमुख राहायला शिकवा.हसण्यामुळे फक्त हसणाऱ्याचाच फायदा होत नाही, तर ‘ते’ अनुभवणाऱ्या, पाहणाऱ्या सभोवतालच्या व्यक्तींनाही त्याचा लाभ होतो. हास्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. ऑफिसमधील बॉस हसऱ्या चेहऱ्याचे असतील तर सर्व स्टाफ मनापासून आणि भरपूर काम करतो. शिक्षक हसरे असतील तर मुलांना ‘सायंकाळच्या पाच’ ऐवजी ‘सकाळची दहाची’ वेळ आवडू लागते. उद्योगाच्या ठिकाणी स्मितहास्यामुळे कामगारांचे काम वाढते , कार्यक्षमता वाढते, प्रगती होते.

हसण्यासाठी पैसे लागत नाहीत. ‘हास्य हे इतकं सोपं, स्वस्त असलं तरी ते विकत घेता येत नाही,चोरता  येत नाही, उसने घेता येत नाही किंवा त्यासाठी याचना करूनही ते मिळत नाही. हसतमुख चेहऱ्यासाठी मनाची तयारी असावी लागते. मनापासून हसण्यामुळे ताण कमी होतो, दुःख कमी होते. म्हणून आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज किमान दोन ते तीन वेळा तरी हसा. हसायला कारण मिळाले तर ठीकच पण तसे ते मिळाले नाही एखाद्या दिवशी एकांतात जा आणि मनसोक्त हसा , कारण हास्यामुळेच जगणे फुलते, हसण्यामुळेच ‘असण्याला ‘ अर्थ प्राप्त होतो.

म्हणूनच , आज १० जानेवारी या ‘जागतिक हास्य दिना’च्या निमित्ताने आपणांस सांगावसं  वाटतं, ‘हसाल तर असाल, न हसाल तर फसाल !’

म्हणून , पुन्हा एकदा …. “स्माईल प्लीज !” 😊

28 Responses

 1. Sachin says:

  Well done Dr.

 2. Ashok Jakune says:

  👍👍

 3. Dhananjay pawar says:

  ☺☺☺ very nice sir,

  Nothing you wear is more important than your smile. The real man smiles in trouble, gathers strength from distress, and grows brave by reflection. Smile, it is the key that fits the lock of everybody’s heart. Beauty is power; a smile is its sword.

 4. Pranav Harugade says:

  रामबाण औषध हास्य😃…..

  ज्यावेळी stress हा शब्दच माहित नव्हता त्यावेळी लोक जास्त आनंदी असायची…विनाकारण हा शब्द असा काही रूढला की शाळेतली मूल पण हल्ली stress वरती चर्चा करतात..

  Let’s wash out stress and have fun in any circumstances..

 5. Hemchandra Patil says:

  Needed one SMILE PLEASE

 6. Smita patil says:

  Very nice article.!शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची काळजी घेत आहात.छान!!!

 7. Sariya satarmaker says:

  😀😁😁😁😁

 8. Dr pallavi anuje says:

  Best article sir

 9. Pooja Patil says:

  Very nice article..,

 10. LK says:

  Great Anil Sir 😃😃as always Champion

 11. Anand Chivate says:

  Mast Article Sir…

 12. Vaibhav Magdum says:

  Very Nice sir

 13. Anuja says:

  Nice sir….

 14. SANDIP PATIL says:

  Very nice article sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *