Blog

Health is much more than wealth. - Dr. Anil Madake

वायुप्रदूषणामुळे होऊ शकतो हृदयविकार !

अपघात, आंदोलन, बंद, मोर्चे, लाचखोरी, फसवाफसवी इत्यादी बातम्यांसारख्याच वायुप्रदूषणाच्या बातम्याही हल्ली नित्याच्या होऊ पाहत आहेत. कांही दिवसापूर्वी उत्तरेतील धुळीच्या वादळाची बातमी आली. दिल्ली, लखनौ, फैजाबाद, सीतापूर, कानपूर आदी भागांत धुळीच्या वादळाने थैमान घातले. दिल्लीतले प्रदूषण प्रचंड वाढले. हवेत धुळीच्या कणांची मात्रा अठरा पट वाढली. किमान तपमान वाढले. एक आठवडाभर बांधकामे थांबविण्याच्या सूचना दिल्ली प्रशासनाने दिल्या.…
Read more

वाढते अपघात टाळण्यासाठी..

गेल्या कांही दिवसात रस्त्यावरील अपघातांची संख्या उन्हाळ्यातल्या तपमानाच्या पाऱ्यासारखी भराभर वाढू लागली आहे . वर्तमानपत्र उघडा , टीव्ही बघा , व्हॉट्स अप मधील मेसेज वाचा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातील कोणताही न्यूज चॅनेल सर्च करा . तुम्हाला एक तरी अपघाताची बातमी दिसते. अलीकडे तर आपल्या देशात एका मागोमाग एक भीषण अशा अपघातांची मालिकाच सुरू असल्याचे चित्र दिसते .…
Read more

दमा हा आजार नव्हे , अवस्था !

एक मे . जागतिक दमा दिवस . मे महिना हा  ‘ दमा जागृती महिना ’ म्हणून ओळखला जातो , तर मे महिन्यातील पहिला मंगळवार हा जागतिक दमा दिवस म्हणून  जगभर साजरा केला जातो. Global  Initiative for Asthma ( GINA ) या जागतिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन हा दिवस  १९९८ पासून साजरा केला जातो . दमा…
Read more

उन्हाळ्यातील दमा

उन्हाळा सुरु झाला की , कांही जणांची भितीने घाबरगुंडी उडते कारण, उन्हाळ्याच्या ठराविक महिन्यातील ठराविक दिवसांत ‘दम्या’ चा त्रास होणार , याची त्यांना कदाचित खात्री वाटत असते. छाती गच्च होणे, प्रचंड धाप लागणे, कोरडा खोकला येणे , अचानक अस्वस्थ वाटणे या तक्रारींची मनात धास्ती असते. या सर्व तक्रारी दम्याचा अटॅक आल्याचे दर्शवितात . दमा हा…
Read more

आयुष्यात संकटे यावीत !

संकट …..! हा एक शब्द उच्चारताच त्याची अनेक रूपे आपल्या डोळ्यांसमोर थैमान घालू लागतात. ‘संकट येतंय ‘ असे म्हटले तरी नको असणारे अनेक विचार आपल्या मनात येतात. जीवन जगायचे म्हटल्यानंतर संकटे ही येणारच. जीवनात जसे सुख मिळते, आनंद मिळतो, तसे दु:ख आणि संकटेसुद्धा येणारच. मात्र संकट आले की, मन घाबरून जाते; काही सुचत नाही; कशाकशात…
Read more